देशात आज राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7:15 ला 8000 महोदयांच्या साक्षीने नरेंद्र मोदी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ सांभाळनारे नरेंद्र मोदी हे देशात दुसरे नेते म्हणून उदयास आले,ही एक अभीमानाची चाहूल आहे.असं म्हणायला काहीही हरकत नाही.
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा बहुमान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लाभणे म्हणजे न भूतो न भविष्यती असं समजायला काहीच हरकत नसावी.संसदेत सरकार चालविण्यासाठी बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचा आहे परंतु देश चालवायला संपूर्ण भारतवासीयांची गरज आहे,असं आपल्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या भाषणात नरेंद्र मोदींनी हे गौरोदगर काढले होते,हे मात्र विशेष.
देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतवासी जनतेच्या इच्छा भरपूर प्रमाणात आहेत आणि असायलाच पाहिजे यात काहीही दुमत नाही.
महागाईने भारतीय जनता होळपळत आहे यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे आणि ही भारतवासी जनतेची पहिली अपेक्षा आहे. शेतकरी शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं जेणेकरून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मूलभूत आधार मिळेल.